दशातवारात “डिजिटलायझेशन” आणून तो जगाच्या प्लॅटफॉर्मवर दाखविण्यासाठी प्रयत्न ; आशिष शेलार

सावंतवाडी, दि.२४:

दशातवारात “डिजिटलायझेशन” आणून तो जगाच्या प्लॅटफॉर्मवर दाखविण्यासाठी प्रयत्न करुया. त्यासाठी महाराष्ट्र शासन तुमच्याशी पार्टनरशीप करायला तयार आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेवून अन्य लोककलांच्या शर्यतीत दशावताराला पहिले स्थान देवूया, असे अभिवचन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी येथे दिले. दरम्यान सावंतवाडीच्या राजघराण्याने दशावतार गंजिफा सारख्या लोककलेला राजाश्रय देवून राजधर्म पाळला आहे. त्यामुळे युवराज लखमराजे यांचे करावे तितके कौतूक थोडेच आहे, असे त्यांनी सांगितले.सावंतवाडी राजघराणे आणि श्री पंचम खेमराजमहाविद्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या दशावतार महोत्सवाचे उद्घाटन श्री. शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, अजय गोंदावळे, राजू राऊळ, अँड. शामराव सावंत, डॉ. सतिश सावंत, प्रा.दिलीप भारमल, भाई कलिंगण, शरद मोचेमाडकर, जयप्रकाश सावंत आदी उपस्थित होते.