विद्यार्थिनीला अश्लील मेसेजस पाठवणाऱ्या नामवंत शाळेतील शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |

✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

रत्नागिरी ; दि २०

शहरातील एसटी स्टँड परिसरातील नामवंत शाळेत विद्यार्थिनीला मोबाईलवर अश्लील मेसेजस पाठवणाऱ्या शिक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल केला आहे. याच शाळेतली ही दुसरी घटना आता समोर आली असून, यापूर्वी प्रथमेश नवेले या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली होती

रोहित एस. भारदे (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल केलेल्या दुसऱ्या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार 5 डिसेंबर 2024 रोजी ती परीक्षेसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी गेली होती. तेव्हा भारदेने तिला, माझे तुझ्याकडे एक महत्वाचे काम आहे, असे सांगत आपला मोबाईल नंबर देऊन आपल्याला व्हॉटसअपवर मेसेज करण्यास सांगितले.
पीडित मुलीने भारदेवर विश्वास ठेवून त्याला मेसेज केला. त्यावर भारदेने त्या विद्यार्थिनीला माझे यूट्युबवर चॅनेल आहे, त्यामध्ये तू काम करशील का, तू मला पाहिजे तशी आहेस, असा मेसेज पाठवला. त्यावर पीडितेने मी घरी विचारुन सांगते, असे भारदेला सांगितले. त्यावर त्याने घरी विचारण्याअगोदर मला जिकडे कोणीही नसेल, अशा ठिकाणी भेट, असे सांगितले. तसेच हा विषय तुझ्यात आणि माझ्यात ठेवण्याबाबतही सांगितले. त्यानंतर भारदेने पीडितेला आपण लॉज, गाडी, तसेच रत्नागिरीच्या बाहेर भेटू, असे वारंवार विचारुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.या प्रकरणी पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारदे विरोधात भारतीय न्याय संहिता 75, 78 तसेच अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.