देवगड : देवगडमध्ये सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
विठ्ठल मित्रमंडळ, विठ्ठलवाडी-देवगड आणि सिंधु रक्तमित्र, शाखा-देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १५ नोव्हेंबर रोजी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
देवगड खालची बाजारपेठ येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे सकाळी ९ वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे देवगड परिसरातील नागरिकांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन विठ्ठल मित्रमंडळ, विठ्ठलवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.
या शिबिराबाबत अधिक माहितीसाठी विजय शिरसाट यांच्याशी ९४२१२८२६७८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
चला तर मग, रक्तदान करूया… एखाद्याला जीवनदान देऊया!












