रेडी-हुडावाडी जंगलात मृतदेह सापडल्याने खळबळ; पोलीस घटनास्थळी दाखल!

वेंगुर्ले : रेडी- हुडावाडी जंगलमय भागात मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
(४५ ते ५५) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच एपीआय श्री. मोरे, पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश कांबळे, पोलीस हवालदार मंगेश जाधव, पोलीस स्वप्रील तांबे, महिला पोलीस हवालदार दीपा मठकर, श्री. लोके, श्री. कलगोंडा आदींनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतला असून पंचनामा करण्यात आला. याबाबत गोविंद मधुकर केरकर (रा. आरोंदा, भटपावणी) यांनी वेंगुर्ले पोलिसात खबर दिली. जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडी उपविभागीय अधिकारी श्री. भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच सावंतवाडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक शे. ष. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर अधिक तपास करीत आहेत.