♻️ कणकवलीत प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; ७ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त!

कणकवली : प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने मंगळवारी कणकवली नगरपंचायतीच्यावतीने व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मंगळवारी आठवडा बाजारात अनेक व्यापारी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देतात. अशा तक्रारी होत्या. या व्यापाऱ्यांवर नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली. यात सुमारे सात किलो प्लास्टिक पिशव्या नगर पंचायत कर्मचाऱ्यांनी जप्त केल्या.