केंद्र सरकारच्या योजना प्रभावी राबवा आ.दीपक केसरकर

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |

✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

सावंतवाडीः दि . १५

केंद्र सरकारच्या अनेक योजना असून त्या योजना प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने नवा आराखडा कर येईल का, यासाठी आ.दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात घेतली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे, वेंगुर्ले- दोडामार्ग तहसीलदार, कार्यकारी अभियंता महेंद्र केणी आदी प्रमुख अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
वन विभाग तसेच इतर प्रश्नांचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला जाईल. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या वेळी कोकणातील आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्रस्तरावरील समस्या तसेच नवीन विकासात्मक कामे सुचवता येतील का? यादृष्टीने एक प्रारूप अहवाल आपण मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर करणार अशी माहिती आ. दीपक केसरकर यांनी दिली.