‘मन की बात’मधून विकासाचा संकल्प; विशाल परबांचा उत्स्फूर्त सहभाग!

सावंतवाडी : मन की बात म्हणजे केवळ एक संवाद नसून, देशवासीयांच्या भावना, अपेक्षा आणि विश्वास यांना अभिव्यक्त करणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रत्येक विचारातून राष्ट्रनिर्माण, समाजसेवा, नवकल्पना आणि जनसहभागाचा संदेश मिळतो.
आज भारतीय जनता पार्टी कार्यालय, सावंतवाडी येथे भारतीय जनता पार्टीचे युवानेते विशाल परब यांनी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभागी होऊन संधीचा लाभ घेतला. देशहितासाठी प्रत्येक नागरिकाने सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि विकासाच्या संकल्पाशी जोडले जाणे हीच या कार्यक्रमाची खरी प्रेरणा आहे.
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या संकल्पनेला अधिक बळ देत विकसित भारताच्या दिशेने आपण सर्वांनी एकत्रितपणे वाटचाल करूया. 🇮🇳