कुडाळ शहरासाठी प्रारूप विकास योजना तयार करण्याच्या दृष्टीने विकास आराखडा बनविण्यात आला व त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी 8 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या विकास आराखड्यामध्ये रस्ता आरक्षण, शासनाच्या मालकीच्या सार्वजनिक मालमत्ता , ग्रीन झोन, त्याचबरोबर शासकीय मालमत्ता ,वगळून खाजगी जमिनीवर विपुल प्रमाणात आरक्षण लादली गेली आहेत. अनेकांची पूर्वपरंपार घरे असताना. बिनशेती आणि बांधकाम करण्यासाठी परवानगी दिलेली असताना ग्रीन झोन ,तसेच संकुले सुद्धा या आरक्षणामुळे बाधित झालेले आहेत आणि याबाबत कुडाळ शहर विकासाच्या दृष्टीने आणि कुडाळ शहरातील कोणतीही कुटुंबे उध्वस्त न होता , पारंपारिक घरे , दुकाने यांना अवाजवी रुंदीचे रस्ते , त्याचबरोबर रस्ते मध्यबिंदूपासून न धरता एकतर्फी दाखवण्यात आलेल्या आहेत आणि विविध आरक्षणांविषयी होणाऱ्या त्रासाबाबत विविध हरकती घेतल्या आणि या आराखड्यात अनेक सूचना केलेल्या आहेत..
कुडाळ शहर विकास आराखड्याला कुडाळवासियांचा विरोध नाही आणि विकासालाही विरोध नाही. विकास आराखड्यामध्ये गरज नसताना दाखविलेल्या अवाजवी रुंदीच्या रस्त्यांना आहे आणि कुडाळ वास यांच्या सर्वाधिक हरकती हे केवळ आणि केवळ रस्ते या विषयावरच आहे , की एवढ्या रुंदीचा रस्त्यांमुळे अनेकांची पूर्वपारंपर घरे ,अनेकांची पूर्वपारंपार दुकाने असणाऱ्या लोकांना भविष्यात अडचणीचे आणि त्रासाचे होईल असा आराखडा बनविण्यात आला होता .यामध्ये कुडाळ अभिमन्यू हॉटेल ते गांधी चौक – एसटी डेपो जाणारा मुख्य रस्ता , डॉ .आंबेडकर पुतळा ते रेल्वे स्टेशन फाटा रस्ता ,कुडाळ ग्रामीण रुग्णालय ते नाबरवाडी रस्ता , कुडाळ पोलीस स्टेशन येथून जाणारा चिंतामणी प्लाझा सिटी सेंटर मधून जाणारा रस्ता.त्याचबरोबर कुडाळ कवीलकाटे रेल्वे रूळ समांतर एमआयडीसी कडे जाणारा रस्ता, श्री देव कुडाळेश्वर मंदिर ते राऊळ घर जवळून हिंदू कॉलनी येथे जाणारा रस्ता , कुडाळ रेल्वे फाटा ते गणपती मंदिर बाव मुख्य रस्ता, कुडाळ हॉटेल गुलमोहर ते भैरववाडी शेत जमिनीतून रेल्वे स्टेशन जाणाऱ्या रस्ता ,कुडाळ संगिर्डेवाडी येथील रस्ता , त्याचबरोबर इंद्रप्रस्थ मधली कुंभारवाडी रस्ता, आणि इतर रस्ते यांच्या अवाजवी आणि अति प्रमाणात दाखविण्यात आलेल्या रुंदी संदर्भात यामध्ये हरकत दिलेल्या आहेत .
कुडाळ शहर नगरपंचायत मालकीच्या अनेक मालमत्ता रजिस्टर रेकॉर्डमध्ये नोंद आहेत .त्याचबरोबर कुडाळ शहरातील इतर शासकीय मालकीच्या जमिनी आणि मालमत्ता ही आहेत .कुडाळ शहरांमध्ये अनेक मोकळे क्षेत्र ग्रामपंचायत आणि नगरपंचायत कडे असलेल्या जमिनी ही संपूर्ण क्षेत्रे या विकास आराखड्यात नमूद केलेली नाहीत आणि जाणून-बुजून येथील पुरस्कार वगळलेली आहेत असेच दिसून येते.शासन एकीकडे लोकांच्या खाजगी जमिनीवर आरक्षण टाकते परंतु स्वतःच्या जमिनी यातून का वगळते याबाबत संशय व्यक्त करण्यासारखाच आहे याबाबत सुद्धा हरकत घेतलेली आहेत. कुडाळ शहर हे कोल्हापूर , बेळगाव , इचलकरंजी , निपाणी एवढे मोठे शहर नाही .आणि एवढी मोठी लोकसंख्या ही नाही. तरी कुडाळ शहरातील स्थानिक लोकांची पूर्वपरंपार घरे दुकाने , प्राधिकरणने दिलेल्या परवानगीने सुद्धा बांधलेली संकुले , घरे यांचा कोणताही विचार न करता रस्त्यांवर घातलेली मोठमोठी आरक्षणे यावर हरकत घेतलेली आहे .हॉटेल गजाली नजीक एस.एन.देसाई चौक येथे जागेवर 15 मीटर मध्ये दुतर्फा रस्ता बसविण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर प्रकारे बनविण्यात आलेला आहे असा रस्ता पंधरा मीटर मध्ये मुख्य ठिकाणी झाल्यास हा रस्ता वर्दळ व विकासाच्या दृष्टीने पुरेसा आहे आणि तो सर्व नागरिकांना दिलासा देणार आहे अशी ही भूमिका मांडण्यात आलेली आहे.
कुडाळ शहरातील भैरव मंदिर हे कुडाळ वासियांचे श्रद्धास्थान आहे. आणि या अवाजवी दाखवलेल्या रुंद रस्त्यांमुळे ते बाधित होणारे दिसून येत आहे आणि त्यावरील हरकत घेतलेली आहेत .
कुडाळ नळपाणी योजनेची हिंदू कॉलनी येथे असलेली टाकी या विकास आराखड्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे पण सभोवतालची 20 गुंठे हून अधिक असलेली जमीन यामध्ये दाखवण्यात आलेली नाही. ही जमीन मिळवण्यासाठी कुडाळ ग्रामपंचायत काळापासून नगरपंचायतीपर्यंत लाखो रुपये या जमिनीसाठी केसेसवर खर्च करण्यात आले परंतु त्यावर कोणताही प्रकारचा आरक्षण टाकण्यात आलेलं नाही या जमिनीवर अनेक भूमाफियांचा डोळा होता अशी चर्चा शहरात चालू असायची परंतु जाणून-बुजून याच्यावर आरक्षण टाकले गेले नाही . यात नक्की गोड बंगाल काय ? याबाबत सुद्धा हरकत घेण्यात आलेली आहे. ,
कुडाळ पोलीस स्टेशन जवळ छत्रपती संभाजी महाराज चौक आहे त्या ठिकाणी शासनाच्या मालकीचा त्रिकोणी भूखंड अस्तित्वात आहे .तिथेच महाराजांचे चांगले स्मारक उभे राहू शकते त्या दृष्टीने सदर भूखंड सुद्धा विकास आराखड्यामध्ये सामील केला गेलेला नाही व सदरची जागा आरक्षित करणं गरजेचं होतं
त्याचबरोबर कुडाळ शहर हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून मालवण, वेंगुर्ले , सावंतवाडी येथे येणारा पर्यटक यांच्या निवासाची सोय कुडाळ शहरांमध्ये ज्याप्रमाणे एमटीडीसी च रिसॉर्ट किंवा निवासी प्रकल्प उभा केला जातो तसं एखादं चांगलं नगरपंचायतीकडून रेस्ट हाऊस सारखं भव्य निवासी प्रकल्प राबवला गेला तर नगरपंचायतचे उत्पन्न देखील वाढू शकते आणि परवडणाऱ्या दरात हे रूम्स उपलब्ध झाले तर पर्यटकांचा याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो याबाबत सूचना मांडण्यात आलेली.
त्याचबरोबर कुडाळ शहर नगरपंचायतीच्या मालकीचे अनेक भूखंड सातबारा दप्तरी नोंद ही आहेत. परंतु सातबारा प्रमाणे संपूर्ण जमिनीचे क्षेत्र विकास आराखड्यामध्ये दाखविलेले गेलेले नाही .याबाबतही हरकत घेतलेली आहे कुडाळ शहरासाठी सावंतवाडी ,वेंगुर्ले प्रमाणे एक चांगले जलतरण केंद्र व्हावे यासाठी सुद्धा जागा आरक्षित सूचना केलेली आहे.
कुडाळ मच्छी मार्केट येथे शासनाची जमीन पूर्ण पणे मच्छी मार्केट इमारतीच्या सभोवताली दाखवण्यात आलेली नाही त्या ठिकाणी पूर्वीपासून नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांची वसाहत आहे एखादा त्यातील भूखंड त्यांच्यासाठी आरक्षित करून एखादा चांगला निवासी प्रकल्प आपल्या सफाई कर्मचाऱ्यांना मिळू शकतो यासाठी सुद्धा जागा आरक्षित करावी ही मागणी केलेली आहे .
त्याचबरोबर भंगसाळ नदीकिनारी कुडाळ भंगसाळ नदी मुख्य गणेश घाट ते महापुरुष मंदिर हायवे पूल देव डोंगर जॅकवेल समोर पर्यंत जाणारा बंधारा रस्ता नऊ मीटरचा भंगसाळ नदीच्या किनारी दर्शवण्यात यावा की जेणेकरून वाहनधारक थेट हायवे पर्यंत पोहोचू शकतो त्याचबरोबर महापुरुष मंदिर दर्शन , तसेच त्या ठिकाणी भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने बोटिंग सुविधा निर्माण झाल्यास त्याचा चांगल्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो आणि या रस्त्यामुळे लगतच्या सर्व जमीन मालकांना उपजीविकेसाठी छोटे छोटे रोजगाराच्या संधी सुद्धा व्यवसायाच्या दृष्टीने त्यामुळे उपलब्ध झाल्यास त्याचा फायदाही संबंधित जमीन मालकांना होऊ शकतो आणि सदरचा भागही विकसित होऊ शकतो .त्यामुळे या विकासाच्या दृष्टीने हा रस्ता समाविष्ट करावा अशी मागणी यामध्ये केलेली आहे तिथूनच पुढे हा बंधारा कम रस्ता जर नदीकिनाऱ्यावरून थेट सांगिर्डेवाडी येथे एस.टी.पी प्लांट पर्यंत जातो हा रिंग रोड झाल्यास तिथली जमीन मालकांनाही आणि शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल त्याचबरोबर मॉर्निंग वॉक तसेच काया किंग सारखे प्रकल्प राबविण्यासाठी हा रस्ता फायदेशीर ठरू शकतो. आणि विशेष म्हणजे सांगिर्डेवाडी येथील एस.टी.पी प्लांट ते वरंडेश्वर मंदिर हायवे पर्यंत सध्या थेट रस्ता उपलब्ध आहे त्यामुळे या गोष्टी टप्प्याटप्प्याने दुर्लक्षित राहिलेला कुडाळ शहरातील भाग विकसित करण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीला फायदेशीर ठरू शकतो आणि यामुळेच या आरक्षणामध्ये जर या गोष्टी दाखविल्या गेल्या तर निश्चितच तेथील शेतकरी वर्गाला नागरिकांना आणि कुडाळ विकासाला चांगला फायदा होऊ शकतो लोकांचा विरोध विकासाला नाही परंतु अवाजवी आणि भरपूर रुंदीचे रस्ते जर दाखवले आणि लोकांची जर जमीन यासाठी एवढ्या मोठ्या रस्त्यांची गरज नसताना या पध्दतीने एकाधिकारशाईने एकतर्फी आरक्षणे लादली तर नक्कीच विरोध असणार परंतु अश्या ठिकाणी कमी रुंदीचे रस्ते केल्यास नागरिक हसतमुखाने हा विकास आराखडा स्वीकारतील . विकास आराखडा बाबत झालेल्या विशेष सभेमध्ये सुद्धा कुडाळ नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी याबाबत चांगली सकारात्मक भूमिका घेतलेली आहेच.या दृष्टीने कुडाळ विकास आराखड्यामध्ये विविध हरकती आणि सूचना केल्या आहेत. याबाबत या भागाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे साहेब यांचे सुद्धा याविषयी लक्ष वेधणार आहे.












