आजगांव पंचक्रोशीत भाजपा युवानेते विशाल परब यांच्या तर्फे शालेय साहित्य वाटपाचा शुभारंभ

शिक्षणाला प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र भाजपा युवानेते विशाल परब यांच्या तर्फे आजगांव पंचक्रोशीत शालेय साहित्य वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात आजगांव जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करण्यात आली.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शिक्षणाला बळ मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून संपूर्ण मतदारसंघात टप्प्याटप्प्याने शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, कोणतीही निवडणूक समोर नसताना केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विशालजी परब सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक उपक्रमाचे आजगांव पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक व शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत असून समाधान व्यक्त केले जात आहे.