मडूरा येथील शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी आणि प्रत्येक बालक आत्मविश्वासाने शिक्षणाच्या प्रवासात पुढे जावे, हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची ताकद देणे म्हणजे सक्षम व प्रगत भारताच्या निर्मितीस हातभार लावणे, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
या उपक्रमाचे परिसरातील नागरिक, पालक व शिक्षकांनी स्वागत करत अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. शिक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहून जनसेवेच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम पुढेही राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.












