कस्टम कडून सलग तिसऱ्या दिवशी पकडली एलइडी लाईट सह नौका,.

रत्नागिरी : प्रतिनिधी,

कस्टम विभागाने सलग तिसऱ्या दिवशी दहा वाव समुद्रात गस्त घालत असताना सोमवारी सकाळी एलईडी लाईट असलेली नौका पकडली. कस्टमच्या धडक कारवाईमुळे मच्छीमारांमध्ये पर्ससीन मच्छीमारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मागील तीन दिवसापासून कस्टम विभागाने 10 वाव समुद्रात एलईडी लाईट लावून मच्छीमारांना सहकार्य करणाऱ्या नौकांविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली आहे. सलग दोन दिवस लाखो रुपयांच्या साहित्यासह दोन नौका पकडल्यानंतर सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कस्टमचे निरीक्षक अभिषेक शुक्ल व सहकारी गस्त घालत होते. यावेळी मिरकरवाड्यापासून दहा वाव समुद्रात मोठ्या प्रमाणात एलईडी लाईट लावलेली नौका दिसून आली. ही नौका पालघर डहाणू येथील असून रत्नागिरी राजिवडा येथील इब्राहिम सुवर्णदुर्गकर या व्यक्तीने चालवण्यासाठी घेतली असल्याचे आढळून आले. ही नौका स्वतः मासेमारी न करता अन्य नौकांना मासेमारीसाठी एलईडी लाईट भाड्याने देत असते.
या नौकेवरही मोठा जनरेटर शेकडो लिटर डिझेल व मोठ्या संख्येने एलईडी बल्ब आढळून आले. या बोटीवर चार खलाशी असलयाचेही पुढे आले आहे. याप्रकरणात कस्टमने ही नौका ताब्यात घेत पुढील कारवाईसाठी मत्स्य विभागाकडे हस्तांतरीत केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.