मुंबई : मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजयजी राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये कोकणातील विविध धरणांच्या प्रलंबित विकासकामांबाबत सकारात्मक बैठक आमदार निलेश राणेंच्या उपस्थित पार पडली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेऊन विविध विषयांवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला. याप्रसंगी जलसंधारण विभागाचे सचिव श्री. जितेंद्र एस. पापळकर तसेच जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.












