मुणगे येथे 21 जून रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

नॅब नेत्र रुग्णालय, देवगड व डॉ. सुनील आठवले यांच्या सहकार्याने तसेच डॉ. सुजीत कदम यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत श्री दत्तकृपा क्लिनिक, भगवती मंदिरासमोर, मुणगे येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये संगणकीकृत पद्धतीने डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू तपासणी, डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान व तज्ज्ञांकडून योग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच गरजू रुग्णांना अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार असून अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्याची सुविधाही या शिबिरात असणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर नेत्र तपासणी व योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. वाढत्या वयासोबत मोतीबिंदू, दृष्टीदोष, डोळ्यांची जळजळ, पाणी येणे, कमी दिसणे अशा अनेक समस्या उद्भवतात. अशा समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुणगे व परिसरातील नागरिकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या मोफत नेत्र तपासणी शिबिराचा मुणगे व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9405274936 / 8669160890