डांबर वाहतूक करणारा टेम्पो पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही…

चालकाचा ताबा सुटल्याने डांबर वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही ,हा अपघात आडळी – कोसम घाटात घडला असून अपघातग्रस्त टेम्पो बांद्या हुन दोडामार्ग कडे डांबर वाहतूक करत होता ,या वेळी आडळी-कोसमवाडी घाटात चालकाचा टेम्पो वरील ताबा सुटला आणि टेम्पो पलटी झाला यात टेम्पो दोन वेळा पलटी होऊन रस्त्यालगत असलेल्या झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला , सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.