“मतदारसंघाचा विकास रखडला; काँग्रेसची केसरकरांविरोधात रणशिंग फुंकले”

सावंतवाडी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार विशेष पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या अनुषंगाने सावंतवाडी, वेगुर्ला आणि दोडामार्ग विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक सावंतवाडी येथील तालुका काँग्रेस कार्यालयात पार पडली. शासनाच्या BLO सोबत समन्वय ठेवण्यासाठी व मतदान केंद्रांवर BLA-2 नियुक्तीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक प्रश्नावरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका करत त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मतदारसंघातील विकासकामांचा बोजवारा उडाला असून केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आली असत्याचा आरोप काँग्रेसने केला.

०१ प्रत्यक्ष काम शून्य सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा अनेकदा करण्यात आली. भूमिपूजनाचे कार्यक्रमही झाले, मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत एक वीटही रचली गेली नसल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना उपचारांसाठी गोवा किवा मुंबईकडे धाव घ्यावी लागत असल्याचे काँग्रेसने म्हटले.

०२ शालेय शिक्षण मंत्रीपदाच्या कार्यकाळात झालेल्या कथित शालार्थ आयडी घोटाळ्याची सखोत चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच राज्यभर चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणातही निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका मांडण्यात आली. या दोन्ही प्रकरणांसह संबंधित आर्थिक व प्रशासकीय बाबींची उच्चस्तरीय SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

०३ आंबोली आणि चौकुळ परिसरातील कबुलायतदार जमीन प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो सोडवण्यात विद्यमान लोकप्रतिनिधीना अपयश आल्याचा आरोप काँग्रेसने केला. निवडणुकीत आश्वासने देऊन नंतर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही सांगण्यात आले.

०४ सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात वाढलेल्या कथित बेकायदा उत्खनन, मायनिंग माफिया आणि अवैध धंद्यांबाबतही काँग्रेसने चिता व्यक्त केली. आडाळी एमआयडीसी परिसरातील उत्खननामुळे शेतकरी आणि स्थानिकांचे नुकसान झाल्याचा दावा करत या प्रकरणांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

०५ पाणी, रस्ते, आरोग्य, रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांनी जनता त्रस्त असताना आमदारांनी मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला. मतदारसंघाच्या विकासासाठी प्रभावी नेतृत्वाची गरज असून जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर यांनी सांगितले.

०६ सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत काँग्रेसतर्फे सनदशीर मागनि आआंदोलन उभारण्यात येणार असून प्रांताधिकाऱ्याऱ्यांना निवेदन सादर केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीस जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर, माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, ज्येष्ठ नेते अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, बाळा धाऊसकर, रवींद्र म्हापसेकर, अॅड. समोर वंजारी, तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, विधाता सावंत, गुणाजी गवस यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.