भांडुपमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन; आ. निलेश राणेंची उपस्थिती

मुंबई – भांडुप : भांडुपचे आमदार मा. श्री. अशोकजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून यारी रोड येथे “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” चे उद्घाटन तसेच छत्री वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार निलेश राणेंना उपस्थित राहण्याचा योग आला.
यावेळी शिवसेना सचिव श्री. रामजी रेपाळे, आमदार श्री. अशोकजी पाटील, शिवसेना स्वीकृत नगरसेवक श्री. उमेश माने, महिला विभाग संघटिका सौ. संध्या वढावकर, महिला विभाग प्रमुख सौ. राजश्री मांडवीलकर तसेच असंख्य शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.