जिल्हा बँकेचे सहकार्य कायम राहील : अध्यक्ष मनीष दळवी
सावंतवाडी : सिंधुदुर्गनगरी सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी, मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल. जेणेकरून सहकारी बळवळ अधिक गतिमान होण्यासाठी मदत होईल, तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बैंकेचे नेहमीच सहकार्य मिळेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी कैले सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ, सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील नूतन कार्यालययाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील मंडळाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सहकारमहर्षी शिवराम भाऊ जाधव यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत नुतन कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यास सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मडळाचे अध्यक्ष गजानन सावत, उपाध्यक्ष सुभाष तळवडेकर, संचालक विलासराव ऐनापुरे, विनोद मर्गज जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, बँकेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा सहकार मंडळाचे सहकार विकास अधिकारी मंगेश पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.












