
सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या अनुषंगाने आज मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला. सागरी किनारपट्टीवरील संभाव्य धोके रोखण्यासाठी सागरी सुरक्षा अधिक सक्षम व सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई किनारपट्टीप्रमाणेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीवरही प्रभावी सागरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, तसेच बोटीवर कार्यरत असलेल्या कामगारांची संपूर्ण माहिती व नोंदी प्रशासनाकडे अद्ययावत ठेवाव्यात, अशा कडक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप, पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.












