मासेमारी बंदी काळात आर्थिक मदतीची तयारी; पालकमंत्री नितेश राणेंनी मत्स्य विभागाच्या बैठकीत दिले महत्त्वाचे निर्णय

मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत विविध महत्त्वाच्या विषयांवरील कार्यवाहीबाबत मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक घेऊन आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने क्रियाशील मच्छीमार सभासदांना मासेमारी बंदी कालावधीत उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, राज्याच्या जलधी क्षेत्रातील पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वाढविणे, ‘फिश पाव’ उपक्रम राबविणे, पेनटाकळी जलाशय नाविन्यपूर्ण एकात्मिक पथदर्शक प्रकल्प कार्यान्वित करणे, ब्ल्यू इकॉनॉमी संदर्भात श्री.सुबोध कुमार(भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या अहवालानुसार करण्यात येणारी कार्यवाही, स्पर्म व्हेल माशाच्या उलटीपासून मिळणाऱ्या “अंबरग्रीस” संदर्भातील धोरण तयार करणे, तसेच मच्छीमार महिलांसाठी हॅन्ड ग्लोज व गमबूट उपलब्ध करून देणे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले आदी उपस्थित होते.