सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयातील दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सविस्तर सादरीकरण पार पडले. मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवत पर्यटन, सौंदर्यीकरणासह आकर्षणाचे केंद्र म्हणून त्याचा विकास करण्याबाबत सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.
बैठकीस आमदार दीपक केसरकर जी, सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती श्रद्धा लखमराजे भोसले, श्री लखमराजे भोसले, वास्तुविषारद स्वरदा पोयरेकर, श्रद्धा कदम, अजय नायक उपस्थित होते.












