आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन कृषी विभाग खरीप हंगाम २०२६- २७ व मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणद रस्ते योजना कुडाळ व मालवण तालुकास्तरीय पूर्व तयारी व नियोजन बैठक पार पडली.
या बैठकीला माजी आमदार श्री. राजन तेली, जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जि. प. उपाध्यक्ष श्री. दादा साईल, बांधकाम सभापती श्री. संतोष साटवीलकर, कुडाळ पंचायत समिती सभापती श्री. मिलिंद नाईक, जिल्हा कृषी अधिकारी, कुडाळ तहसीलदार श्री. सचिन पाटील, मालवण तहसीलदार श्री. गणेश लव्हे, कुडाळ व मालवण तालुका कृषी अधिकारी आदी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते.












