“जिल्हा बँकेचा दमदार विकास! दरडोई उत्पन्न वाढीत मोठा वाटा : प्रमोद कामत”

वेंगुर्ला : आर्थिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा लहान असला तरी या वर्षी बँकेने ७ हजार कोटींचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. बँकेच्या ठेवींमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. एवढा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष व संचालक मंडळावर ग्राहकांनी, जिल्हावासियांनी दाखवला हे काम कौतुकास्पद आहे. खासदार नारायण राणे यांनी नेतृत्व हेरून अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा हिरा जिल्हा बँकेला मनीष दळवी यांच्या स्वरूपात अध्यक्ष म्हणून दिला. राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा जिल्हा बँकेतील कर्मचारी आपुलकीने, विश्वासाने बँकींग सेवा देत आहेत. जिल्हा बँकेच्या माध्यमातून मनीष दळवी जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना जिल्हा वासीयांनी साथ द्यावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मठ येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक मठ शाखा नुतन वास्तू स्थलांतर सोहळा संपन्न झाला. नुतन शाखा इमारत स्थलांतर सोहळ्याचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जि.प. सभापती प्रितेश राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, प्रकाश मोर्ये, वेंगुर्ला प.स. सभापती शंकर घारे, वेंगुर्ला प.सं सदस्य नितीन मांजरेकर, मठ सरपंच रूपाली नाईक, उपसरपंच सोनाली मठकर, मठ वि. सोसा. चेअरमन सुभाष बोवलेकर, श्री देव स्वयंभू देवस्थान समिती मठ अध्यक्ष मनोहर गावडे आदि मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. सुरू झालेली बँकेची मठ शाखेकडे आज १६वर्षानंतर सुमारे ९ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत तर मागील एका वर्षात १ कोटी ठेवी शाखेत जमा झाल्या. बँकेच्या सेवेवर येथील ग्राहकानी, ठेवीदारांनी जो विश्वास दाखवला त्यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो. बँकेची प्रगती किंवा उलाढालीचा वेग हा १२% ते १४ टक्के च्या पुढे कधी गेलेला नाही. पण बँकेने यावर्षी १७% च्या पुढे उलढालीचा वेग प्राप्त केला आहे. ठेवीदारांच्या बँकेतील सुरक्षित ठेवी ठेवण्याच्या दृष्टीने उत्तम कारभार असावा, त्यांचा विश्वास वाढवा, यासाठी बँकेचा कारभार पारदर्शक असावा यासाठी खासदार नारायण राणे नेहमी आग्रही राहिले आहेत. त्यांची एक भूमिका राहिलेली आहे. जिल्हा बँकेचा नफा वाढेल तसे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे. त्या दृष्टीने जिल्हा बँकेचा चेअरमन म्हणून व आम्ही सर्व संचालक मंडळ काम करत आहोत. असेही मनीष दळवी शेवटी म्हणाले उपस्थित मान्यवरांचा तसेच ठेवीदार, विद्यार्थी यांचा पुष्पगुच्छ देउन यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेचे प्र. मुख्य कार्य अधिकारी दिवाकर देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या सोहळ्यास प्रशासन सरव्यवस्थापक शरद सावंत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सरव्यवस्थापक के. बी. वरक, मठ शाखा व्यवस्थापक सागर परब, तालुका विकास अधिकारी किशोर गोवेकर, विकास अधिकारी विवेकानंद बागलकर, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी, मठ गावातील ग्रामस्थ, ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने या उ‌द्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.