धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नवीन पिढीसमोर यावे यासाठी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब आणि वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांचा पुढाकार, भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री विशालजी परब आणि सौ वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते नाटकाचे दिमाखदार उद्घाटन!
छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत धगधगता इतिहास नवीन पिढीसमोर यावा यासाठी शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी सायंकाळी ९ वाजता “इथे ओशाळला मृत्यू” हे महान ऐतिहासिक नाटक वेंगुर्ले येथील नाट्यकर्मी मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. सदर नाटकाचे उद्घाटक म्हणून भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते सन्माननीय श्री विशालजी परब आणि सौ वेदिका परब यांचे प्रमुख उपस्थिती लाभली. वेंगुर्ले नगराध्यक्ष माननीय श्री राजनजी गिरप, डॉ. संजीव लिंगवत, डॉ. काळे, डॉ.उबाळे, ज्येष्ठ भाजपा नेते आणि वेंगुर्ले तालुक्यातील सामाजिक चळवळीचे मार्गदर्शक मा. शरदजी चव्हाण, भाजपा जिल्हा पदाधिकारी मा. प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, नगरसेवक सुहास गवंडळकर, नगरसेवक सचिन शेट्ये, नगरसेविका गौरी माईनकर, नगरसेविका रिया केरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शेकडो रसिक प्रेक्षकांनी या अजरामर ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा अंगावर रोमांच उभा करणारा अनुभव आज पुन्हा नव्याने घेतला. डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग वर्किंग कमिटी वेंगुर्ले आणि वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन या वैद्यकीय संस्थांच्या माध्यमातून या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.
या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात विविध सामाजिक काम सुरू आहे. वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आदी उपक्रम यावर्षी संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा त्याग आणि बलिदानाचा इतिहास हे महाराष्ट्राच्या इतिहासातील असे सोनेरी पान आहे, ज्याला रक्तरंजीत इतिहासाची दुर्दैवी झालर आहे. हा इतिहास विसरता येण्याजोगा नाही आणि विसरावा असा तर मुळीच नाही. हा इतिहास नव्या पिढीच्या रक्तात भिनला पाहिजे, असे भावपूर्ण उद्गार या नाट्यप्रयोगाच्या वेळी श्री विशालजी परब यांनी काढले. या नाट्यप्रयोगानंतर प्रेक्षक पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याप्रति हळव्या भावविश्वाच्या आणि कठोर बलिदानाच्या इतिहासाने पुन्हा एकदा भारावून गेल्याचे चित्र दिसून आले








