पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते जनजागृती करणाऱ्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन

📍०१ मे २०२६ : पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्ग

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण आणि अनुसुचित जाती उपयोजना अंतर्गत ‘सामाजिक न्याय तसेच विविध विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची’ जनजागृती व्हावी म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचे मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन आज करण्यात आले.


यावेळी आमदार निलेशजी राणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडिमिसे, पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हापरिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.