“पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन : सिंधुदुर्ग पोलीस दल अधिक सज्ज”

०१ मे २०२६ : पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्ग
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्ग पोलीस परेड ग्राउंड येथे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या अत्याधुनिक सोशल मीडिया लॅबचे उद्घाटन मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीत तांत्रिकदृष्ट्या मोठी भर पडणार आहे.


या सोशल मीडिया लॅबसाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली असून अत्याधुनिक उपकरणे व स्वतंत्र कार्यप्रणालीची यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. गुन्हे तपास, सायबर क्राइम नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने ही लॅब महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग पोलीस दल अधिक सक्षम, सजग आणि तंत्रज्ञानसज्ज होऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास आहे.


यावेळी आमदार निलेशजी राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल आदी उपस्थित होते.