देवगड : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, कोकणचे भाग्यविधाते, विद्यमान खासदार आदरणीय नारायण राणे साहेब यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर पुरस्कृत व युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद पाटील आणि G.C.C. क्रिकेट क्लब देवगड किल्ला यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हनुमान मंदिर देवगड किल्ला येथील पटांगणात भव्य दिव्य खासदार चषक नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा देवगड तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम यांचे शुभ हस्ते फित कापून तर उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचे शुभ हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला. तर खासदार चषकाचे अनावरण सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस संदीप साटम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी संदीप साटम यांचा वाढदिवस सोहळा केक कापून अत्यंत जल्लोषपूर्ण वातावरणात व फटाक्यांच्या आतिषबाजीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
या स्पर्धेच्या शुभ प्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा सरचिटणीस संदीप साटम, देवगड तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम, देवगड जामसंडे भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, देवगड तालुका भाजपा सरचिटणीस योगेश चांदोस्कर, तालुका उपाध्यक्ष उल्हास मंचेकर, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, उमेश कनेरकर, भाजपा देवगड जामसंडे महिला शहराध्यक्ष तन्वी शिंदे, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, नगरसेवक चंदू कावले, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर, रवींद्र कोयंडे, श्रुती जाधव, नीनाद देशपांडे, सिद्धेश माणगावकर, ओमकार सारंग, अमोल जोशी, दीपक जानकर, गुरुनाथ वाडेकर, अशोक गोळवणकर, राजा निकम, पप्पू जाधव, G.C.C. किल्लाचे सर्व सभासद व देवगड जामसंडे शहरातील बहुसंख्य कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष, नागरिक आणि क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित साटम, शहराध्यक्ष दयानंद पाटील तसेच नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. ही भव्य दिव्य खासदार चषक क्रिकेट टूर्नामेंट देवगड तालुक्यात प्रथमच आर्टिफिशियल ग्रास मॅटिंगवर खेळविली जात असून हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे . या स्पर्धेमध्ये देवगड तालुक्यातील नामांकित अशा एकूण २६ संघांनी सहभाग घेतला असून शनिवार व रविवार अशी दोन दिवस ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. ऋत्विक धुरी यांनी मानले.












