मिठबाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

NAB आय हॉस्पिटल, देवगड यांच्या वतीने डॉ. मयुरेश खाडीलकर यांच्या धन्वंतरी क्लिनिक, मिठबाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा एकूण ५५ रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिरामध्ये रुग्णांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. डोळ्यांच्या विविध आजारांचे निदान करण्यात आले तसेच मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) तपासणीही करण्यात आली. ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती अशा रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून चष्म्याचा सल्ला देण्यात आला.
NAB आय हॉस्पिटल, देवगड हे गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रसेवेत कार्यरत असून आतापर्यंत १५,००० पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात अनेक मोफत नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली आहे.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल NAB आय हॉस्पिटल, देवगड येथील ऑप्टोमेट्रिस्ट श्री. दशरथ हक्के तसेच देवगड मेडिकल फाउंडेशनचे श्री. प्रसाद कदम यांनी मिठबाव येथील नागरिकांचे आणि डॉ. मयुरेश खाडीलकर यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी नमूद केले.