भाजपा स्थापना दिनी सावंतवाडीत “सेल्फी विथ लोटस”ची क्रेझ; विशाल परब यांची अनोखी संकल्पना चर्चेत

सेल्फी विथ लोटस…!

भाजपा वर्धापन दिनानिमित्त भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडीत भाजपाचा आकर्षक सेल्फी पॉईंट! सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्या शुभहस्ते उद्घाटन!

सहा एप्रिल हा भाजपाचा स्थापना दिवस पूर्ण देशभरात उपक्रमांतून साजरा होत आहे. भाजपा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब यांच्या एका अनोख्या संकल्पनेतून सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात आकर्षक सेल्फी पॉईंट उभा करण्यात आला आहे. हजारो कार्यकर्ते या “सेल्फी विथ लोटस” थीमनुसार आपले सेल्फी फोटो भाजपाच्या कमळासोबत काढत ते विविध सोशल मीडियावर व्हायरल करताना दिसून येत आहेत.

आजच्या स्थापना दिनाला सावंतवाडी नगरपंचायतीचे उपसभापती श्री गौरव मुळीक यांच्या शुभहस्ते या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशाल जी परब यांच्या समवेत सावंतवाडी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर,भाजपा सोशल मीडिया प्रमुख श्री केतन आजगावकर, नगरसेवक ॲड.सिद्धार्थ भांबुरे, जिल्हा पदाधिकारी श्री मनोज नाईक, श्री. रंगनाथ गवस, माजी नगरसेवक राजू बेग, युवा मोर्चा शहराध्यक्ष हितेन नाईक, श्री शिरीष नाईक, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, साईनाथ जामदार, सुमित वाडकर, संतोष गावस आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.