श्रीराम नवमीचे औचित्य साधत श्री देव वेतोबा देवस्थान तर्फे विद्यार्थ्यांसाठी अनोख्या स्पर्धेचे उपक्रम

वेंगुर्ला आरवली : श्रीराम नवमीचे औचित्य साधून श्री देव वेतोबा देवस्थान व्यास व भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्तोत्रपठण स्पर्धा संपन्न झाली. इयत्ता दुसरी पर्यंत गणपती स्तोत्र इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी मारुती स्तोत्र आणि पाचवी ते सातवी व आठवी पासून पुढे खुल्या गटात रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धा संपन्न झाली. श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृह संपन्न झालेल्या या स्तोत्र पठण स्पर्धेत लहान व मोठ्या गटात मिळून एकूण 61 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी भाग घेतला श्री देव वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री जयंत राय यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली प्रस्ताविक व स्वागत श्री रविंद्र पणशीकर यांनी केले देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री जयंत राय यांनी सदर स्पर्धा आयोजित करण्याचे उद्दिष्ट समजून सांगितले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री रविंद्र पणशीकर सौ. स्नेहा जोशी आणि सौ. नम्रता राय यांनी काम पाहिले. या स्पर्धेत आरवली, शिरोडा, रेडी, आजगाव, आसोली, जोसोली, फणसखोल, सागर तीर्थ येथील सुमारे साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला