नेमळे धनगरवाडीत असंख्य ग्रामस्थांचा भाजपात पक्षप्रवेश

सावंतवाडी : नेमळे येथील धनगरवाडी परिसरातील असंख्य ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख विचारांवर विश्वास ठेवत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांच्या हस्ते व सावंतवाडी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना संदीप गावडे यांनी सांगितले की, “प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या वाड्यांच्या विकासासाठी आजवर मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भविष्यातही भाजपच्या माध्यमातून विकासासाठी भरीव निधी मिळवून देऊन धनगरवाडीचा सर्वांगीण विकास निश्चित केला जाईल.” हा पक्षप्रवेश कार्यक्रम नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांच्या विशेष पुढाकारामुळे यशस्वी झाला. त्यांच्या प्रयत्नांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
या प्रसंगी सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक विलास जाधव, शक्तिकेंद्र प्रमुख गौरव मुळीक, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे, तसेच नेमळे गावातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे नेमळे धनगरवाडी परिसरात भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी काळात विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कोकणशाही सावंतवाडी