
साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग
आज मंगळवार दिनांक 13 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वा. निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजेल असे संकेत आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर आता ग्रामीण भागात पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडताना पाहायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग मध्ये युती अन आघाडी होते कि नाही याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.