
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याहस्ते शुभारंभ
मालवण : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत जनसुविधा कार्यक्रमातून देवली काळेथर मयेकरवाडी पिरकोलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण कामासाठी ५ लाख निधी मंजूर करण्यात आला. या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, उपतालुकाप्रमुख विजय चव्हाण, सरपंच शाम वाक्कर, विभाग प्रमुख मंदार लुडबे, मनीष पाटकर, गणेश आचरेकर, रोहन मयेकर, श्री आजगावकर, गणेश मयेकर, शामा पेडणेकर, शिवदास चव्हाण, ऋषी आचरेकर यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. कोकणशाही मालवण