
कणकवली : जाणवली येथे दुचाकी आणि कार धडकून भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी झाला आहे त्याच्यासोबत आणि एक जण होते ते देखील जखमी झाले आहेत दोघांनाही कणकवलीत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले सर्वेश डिचवलकर वय 25 हरकुल खुर्द, संजयकुमार राजभर वय 38 हरकुल खुर्द हे या अपघातात जखमी झाले आहेत अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.
अपघाताची माहिती समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले नेमका अपघात कसा झाला हे समजू शकले नाही पण दुचाकी रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाल्याचे पोलिसांकडून बोलले जात आहे घटनास्थळी कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी भेट देऊन पाहणे देखील केले.
यावेळी स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते सुदीप कांबळे यांनी जाणवलीत वारंवार होणाऱ्या अपघाता संदर्भात प्रशासनाने लक्ष द्यावे फक्त रस्ता क्रॉसिंग वर सिग्नल लावून उपयोग नाही तर रमलर लावण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोकणशाही कणकवली