मंत्री नितेश राणेंचे ट्विट ठरले खळबळजनक!

कणकवली : नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे धक्कादायक निकाल हाती आल्यानंतर अनेक नेत्यांनी आपापल्या परिनं मीडीयासमोर आपल्या प्रतिक्रीया दिल्या. सिंधुदुर्गात न झालेली युती आणि पराकोटीला पोहोचलेला संघर्ष यामुळं अवघ्या राज्याचं लक्ष इथल्या निकालाकडं लागुन होतं. नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे धक्कादायक निकाल हाती आल्यानंतर अनेक नेत्यांनी आपापल्या परिनं मीडीयासमोर आपल्या प्रतिक्रीया दिल्या. परंतु जिल्हयाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकतंच एक खळबळजनक व्टीट केलंय. त्यात ते म्हणतात,

अगदी मोजक्या शब्दातलं परंतु एक गंभीर इशारा असलेलं हे व्टिट सध्या राजकीय वर्तुळातच नव्हे तर कोकणवासियांमध्ये जोरदार चर्चेत आहे. निवडणुकांचं राजकारण आणि पक्षाच्या मर्यादा तसंच कुटुंबाची प्रतिमा जपण्यासाठी त्यांनी यादरम्यान कोणावरही टीका करण्याचं टाळलं होतं. विकासकामांवरच भर देत त्यांनी निवडणुकीत आपला करिश्मा दाखवला होता. परंतु या दरम्यान अशा कोणत्या राजकीय घडामोडी घडल्या की मंत्री नितेश राणेंना अशा प्रकारचं व्टिट करावं लागलं? या व्टिटचा रोख नेमका कोणाकडं आहे, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

या व्टीटनुसार खरंच मंत्री नितेश राणे यांनी सत्य मांडलं तर कोणता नेता अडचणीत येवु शकतो, कोणत्या नेत्याच्या अस्तित्वाला सुरूंग लागु शकतो, त्यांच्याकडुन कोणाचं शरसंधान होणार आहे, कोणाकोणाची विकेट जाणार आहे, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत. या व्टिटच्या माध्यमातंन त्यांनी नेमका कोणाला इशारा दिला आहे, हे काही दिवसात स्पष्ट होईलच, परंतु काही शब्दांचं मंत्री नितेश राणेंचं हे व्टिट नजीकच्या काळात कोणाची पोलखोल करणार, याची मात्र उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोकणशाही कणकवली