डॉ. रिया जैन आठवले यांचे संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर गौरवाने प्रतिनिधित्व

मुंबई – डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. यांच्या वतीने कार्यरत असलेल्या डॉ. रिया जैन आठवले यांना संयुक्त राष्ट्रांच्या United Nations Global Compact Network India (UN-GCNI) आयोजित Business Conclave मध्ये Esteemed Faculty & Guest Speaker म्हणून आमंत्रित होण्याचा मोठा सन्मान प्राप्त झाला.
मुंबई क्रिकेट असोसिएशन कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेत डॉ. रिया यांनी Healthcare & Supply Chains या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर प्रभावी व परिणामकारक सत्र सादर केले. देशातील आरोग्य व्यवस्थेची पारदर्शकता, नैतिक खरेदी व्यवस्था, रुग्णकेंद्रित निर्णयप्रक्रिया आणि पुरवठा साखळीतील प्रामाणिकतेचे महत्व त्यांनी अत्यंत सजगतेने मांडले.
या कार्यक्रमात भारतासोबतच अनेक देशांतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती होती. विविध राष्ट्रांतील वक्त्यांबरोबरच भारताचे औपचारिक प्रतिनिधित्व करत डॉ. रिया यांनी आरोग्य आणि पुरवठा साखळी विषयक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय दस्तऐवजावर स्वाक्षरी करून देशाचे प्रतिनिधित्व अभिमानाने निभावले. या योगदानाबद्दल त्यांचा कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. रिया जैन आठवले या व्यवसायाने Physician असून सध्या त्या Devgad Medical Foundation येथे वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांनी मागील काही वर्षांत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवून आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण केले आहे.
या ऐतिहासिक संधीबद्दल डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. आणि देवगड मेडिकल फाउंडेशनतर्फे डॉ. रिया जैन आठवले यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. कोकणशाही मुंबई