मुंबई : राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
महापालिका निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात – 23 डिसेंबर 2025
- अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत – 30 डिसेंबर 2025
- अर्जांची छाननी – 31 डिसेंबर 2025
- अर्ज मागे घेण्याची मुदत – 2 जानेवारी 2026
- निवडणूक चिन्हं आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी 2026
- मतदान – 15 जानेवारी 2026
- मतमोजणी अर्थात निकाल – 16 जानेवारी 2026
राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदार होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर केले जाणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी एकसदस्यीय प्रभाग असून, इतर 28 ठिकाणी बहुसदस्यीय प्रभागरचना आहे. त्यामुळं अशा ठिकाणी मतदारांना काही ठिकाणी तीन, चार, पाच मते द्यावी लागणार. कोकणशाही मुंबई
