डॉ. नागवेकर हॉस्पिटल तोडफोड प्रकरणावर मोठी कारवाई

कणकवली पोलिस ठाण्यात ४० ते ५० जणांवर गुन्हे दाखल

कणकवली : कासार्डे येथील युवती कस्तुरी पाताडे हिच्या मृत्युनंतर संतप्त जमावाने रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाºयांना धक्कबुकी केली होती. त्यानंतर जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. याप्रकरणी मृत युवतीच्या नातेवाईक दिलेल्या फिर्यादीनुसार दोन डॉक्टरांवर तर डॉ. नागवेकर यांनी फिर्यादीनुसार ४० ते ५० जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

युवती मृत्यू व रुग्णालय तोडफोडप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यामुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या गुन्हयाबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.

कस्तुरीच्या मानेच्या वरील भागात असलेली गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया शनिवारी येथील नागवेकर हॉस्पिटलमध्ये झाल्यानंतर युवतीची प्रकृती खालावली. तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल केल्यानंतर युवतीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह रविवारी डॉ. नागवेकर रुग्णालयाच्या दारावर ठेवत ठिय्या मांडला होता.

शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच युवतीचा नाहक बळी गेला आहे, असा आरोप करीत संपप्त जमावाने रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनाही धक्काबुकी केली. तसेच जमावाने रुग्णालयाची तोडफोड करत ४ तास रुग्णालयासमोर ठिय्या मांडला होता. गुन्हे दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोकणशाही कणकवली