कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे , निवसर ते अडवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने हि वाहतूक विस्कळीत झाली आहे.
त्यामुळे अनेक गाड्या विविध ठिकाणी थांबून आहेत, कोकण रेल्वे महामार्गावर जे विद्युतीकरण झाले आहे, तेथे निवसर ते अडवली दरम्यान असलेली ओव्हरहेड वायर आज दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान तुटली होती , त्या वर रेल्वे प्रशासनाकडून तातडीने काम सुरु करण्यात आले होते, त्या नंतर २ वाजेच्या सुमारास धिम्यागतीने वाहतूक सुरु झाली असल्याची माहिती समोर आली आहे , त्यामुळे ह्या ठिकाणी रेल्वे स्थानकावर गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरु ठेवण्यात आल्याने कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून काम युद्ध पातळीवर सुरु असून लवकरात लवकर काम पूर्ण केले जाणार असल्याचं रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे .










