‘वर्षा’ बंगल्यावर फडणवीस-राणे यांच्या राजकीय चर्चेला उधाण

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची सायंकाळी ‘वर्षा’ बंगल्यावर अत्यंत महत्त्वाची भेट पार पडली. ही भेट दिवाळीच्या निमित्ताने “सदिच्छा भेट” म्हणून झाली असली, तरी तिच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राजकीय चर्चामुळे राज्याच्या सत्तेच्या गणितात नव्या हालचालींची चाहूल लागली आहे.
सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि मुंबई महानगरपालिका निवडणुका यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे कोकणातील राजकारण, भाजपचे संघटनात्मक बळकटीकरण आणि राणे गटाच्या रणनीतीबाबतही या भेटीत महत्त्वाची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपसाठी कोकण हे आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार असून, त्या पार्श्वभूमीवर फडणवीस-राणे भेट ही केवळ औपचारिक नसून राजकीय “गेम चेंजर” ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
राज्याच्या राजकारणात दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या या संवादामुळे सत्तेच्या समीकरणात नवे रंग भरले आहेत. कोकणातील राणे ब्रँडची ताकद आणि मुंबईतील भाजपचे नेटवर्क- या दोन्हींचा संगम झाल्यास विरोधकांसाठी मोठी डोकेदुखी निर्माण होऊ शकते, असे राजकीय निरीक्षक सांगत आहेत कोकणशाही मुंबई