अरबी समुद्रात वादळ सदृश परिस्थिती निर्माण होते आहे. त्यामुळे उद्यापासून कर्नाटक, गोवा आणि कोकणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. बंगालच्या उपसगारात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या दोन्हीही कमी दाबाचे क्षेत्र प्रणालीचा प्रभाव टाकत असल्यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कोकणात पुढील तीन दिवस मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मिळलेल्यामाहितीनुसार, सध्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस पडल्यास कापलेल भात भिजून वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. तर जिल्ह्यात पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे, दिवाळीच्या दोन दिवसात फटाक्याची आतिशबाजी मुंबईत जोरदार सुरू आहे. याचा फटाक्याचापरिणाम मुंबईच्या हवेवर आणि प्रदूषणावर झाला आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबईत बुधवारी धूसर वातावरण पाहायला मिळाले. दिवाळीत काही ठिकाणी पडलेल्या पावसामुळे आज वातावरणात हलकासा बदल जाणवत आहे. तर AQI चा उच्चांक ही खाली आला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील दोन दिवस काही भागात पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. कोकणशाही सिंधुदुर्ग









