आ. निलेश राणे यांचे विश्वासू निकटवर्तीय व जनतेच्या सुख दुःखात धावून जाणारा चेहरा म्हणून साईराज दळवी यांची ओळख
साईनाथ गांवकर | कोकणशाही
पिंगुळी जिल्हा परिषद मतदार संघामधील खुल्या आरक्षण मुळे पिंगुळी गावातील युवा नेतृत्व व युवा सेना कुडाळ तालुका सचिव साईराज उर्फ साई दळवी यांच्या नावाला युवा वर्गाची जोरदार पसंती मिळत आहे.
पिंगुळी जिल्हा परिषद मतदार संघ नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण आरक्षणमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ह्या मतदारसंघात मध्ये अनेक मातबर उमेदवार भविष्यात रिंगणात उतरणार आहेत. ह्यावेळी मात्र पिंगुळी गावातील धडाडीचे युवा कार्यकर्ते व आमदार निलेश राणे यांचे विश्वासू निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे साई दळवी यांच्या नावाला युवा वर्गातून पसंती मिळत आहे.
पिंगुळी जिल्हापरिषद मतदारसंघ मध्ये पिंगुळी, साळगाव मांडकुली,केरवडे, तूळसुली,मुळदे अश्या गावांचा समावेश होतॊ. साई दळवी गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात आमदार निलेश राणे साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. गावांतील युवा वर्गामध्ये त्यांचा संपर्क आहे. युवा सेनेच्या माध्यमातुन युवा कार्यकर्ते ची मोठी फळी त्यांच्या सोबत आहे.
पिंगुळी शेटकरवाडी येथील सहकारक्षेत्रातील नेते, पिंगुळी कार्यकारी सोसायटी चे चेअरमन विजय दळवी यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या राजकीय अभ्यासाचा व कार्याचा मोठा फायदा आगामी निवडणुकीत त्याना होऊ शकतो. साई दळवी यांना उमेदवारी मिळाल्यास युवा वर्गाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळू शकतो हे मात्र नक्की. भविष्यात पिंगुळी जि.प मधून साई दळवी यांसारख्या सक्रिय युवा कार्यकर्त्याला संधी मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.










