सावंतवाडी : भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘मेक ईन कोकण’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला चालना देण्यासाठी ‘उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सव २०२५’ चे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांच्या हस्ते या महोत्सवाचा शुभारंभ झाला.
या महोत्सवामध्ये बचतगटांच्या उत्पादनांपासून सर्व क्षेत्रांतील कोकणवासीय उद्योजकांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक उत्पादनांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार, बेरोजगार तरुणांना योग्य व्यावसायिक दिशा मिळावी आणि स्थानिक उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ मिळवून देता यावी, या दुहेरी उद्देशाने या ‘उद्योग, व्यवसाय, रोजगार महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
युवा नेते विशाल परब यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेला प्राधान्य देत, कोकणाला ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा निर्धार केला आहे. ‘मेक ईन कोकण’ या अभियानाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत परब यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यावेळी सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महिला मंडळ अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर, माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, युवा मोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, सरचिटणीस दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर, शक्ती केंद्र प्रमुख अमित गवंडळकर, बूथ अध्यक्ष विजू साटेलकर, रंगनाथ गवस, शिरीष नाईक, सुकन्या टोपले, नयना सावंत, मेघना साळगावकर, अनुषा मेस्त्री, ज्योती मुद्राले यांच्यासह सावंतवाडीतील नागरिक, उद्योजक, युवा, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकणशाही सावंतवाडी



