शाळा केळूस-कालवीबंदर येथे शारदोत्सवाची मंगलमय धूम

शाळा केळूस-कालवीबंदर येथे शारदोत्सवाची मंगलमय धूम

केळूस, ता. वेंगुर्ला ,जि. सिंधुदुर्ग : शाळा केळूस-कालवीबंदर येथे नवरात्रोत्सवानिमित्त शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. सकाळी श्री सरस्वतीमातेची प्रतिमा विधीवत पूजन करून उत्सवाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोकपठण, गाणी, नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण आनंदमय केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कोवळ्या कलाकृतींनी उपस्थितांचे मन मोहून टाकले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती केळूस-कालवीबंदर अध्यक्ष :श्री महेश विठ्ठल नागवेकर, उपाध्यक्ष: सौ मानसी मुकुंद कुडव, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष – श्री बाबुराव सिताराम ताम्हणकर, माता पालक संघ उपाध्यक्ष – सौ. अर्चना आनंद केळुसकर, मुख्याध्यापक – श्री मंगेश अंकुश येरम, पदवीधर शिक्षक – श्री मनीष अशोक खोंडे, उपशिक्षक – श्री उमेश उत्तमराव चव्हाण. गावातील मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत उत्साह वाढवला. शाळेचे मुख्याध्यापकांनी शारदोत्सव हा ज्ञान, कला व संस्कृतीचा संगम असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सतत प्रगतीच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या शेवटी प्रसादाचे वाटप करून शारदोत्सवाचा समारोप झाला. शारदोत्सवाने शाळेत भक्ती, संस्कृती आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला.

कोकणशाही प्रतिनिधी : श्री. प्रशांत उ. रेवणकर