सिंधुदुर्ग ओरोस येथे झालेल्या अपघातात व्हॅगनारची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालय परिसरातील वळणावर घडली होती. श्रीकृष्ण सावंत असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर गोवा- बांबुळी येथे उपचार सुरू होते मात्र उपचारदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
याबाबत अधिक माहिती अशी की, त्यातील खबर देणारा तेजस हरेश सावंत (वय 22 वर्षे, व्यवसाय – शिक्षण, रा. ओरो खुर्द डोंगरेवाडी) याचा भाऊ श्रीकृष्ण हरेश सावंत हा आपल्या ताब्यातील मोटरसायकल घेवून ओरोस फाटा ते गजानन हॉटेल अशी एकेरी वाहतूक करीत असताना सिंधुदुर्गनगरी कोको हॉटेलच्या पुढील वळणावर आला असता त्याच रोडने समोरून एकेरी मार्ग असून सुद्धा विरुद्ध रस्त्याने ओरोस फाट्याच्या दिशेने एक गोल्ड रंगाची व्हॅगनारने सावंत ययाच मोटरसायकलला जोरात धडक दिली व त्यात मोटर सायकल चालक श्रीकृष्ण सावंत यांचे डोक्याला गंभीर दुखापत झाली व मोटरसायकलचे नुकसान झाले. या प्रकरणी चालक विनय मंगेश आळवे, (वय-30 वर्षे, रा. कांबळेवीर वेंगुर्ला, ता- वेंगुर्ला यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमी श्रीकृष्ण सावंत यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा- बांबुळी येथे हलविण्यात आले होते. सायंकाळी उपचार सुरू असताना श्रीकृष्ण सावंत यांचे निधन झाले आहे.










