मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया नजीकच्या एलिफंटा कडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात १३ प्रवाशांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना १८डिसेंबर ला घडली , या दुर्घटनेवेळी आरिफ आदम बामणे यांनी स्वतः च्या बोटीतून घटनास्थळी जाऊन ३५ जणांचे प्राण वाचवले,
या बद्दल शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी आरिफ आदम बामणे यांना आपल्या अंधेरी कार्यालयात बोलवून त्यांचा सत्कार केला . केवळ या सत्कारवर न थांबता राणे प्रतिष्ठानच्या वतीने आरिफ यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला आयुष्यभर मोफत मेडिकल सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय निलेश राणे यांनी घेतला आहे.
कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी एक पाऊल पुढे जाऊन आरिफ यांच्या धाडसाचे कौतुक म्हणून त्यांच्यासह त्यांना आणि संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर मोफत मेडिकल सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे ,राणे प्रतिष्ठान चे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू, जिल्हाध्यक्ष बिलाल शेख आणि उपाध्यक्ष इम्तियाज अली शेख हे उपस्थित होते , निलेश राणे यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.










