कुडाळ नगरपंचायतचे बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता!


कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे बसवुन विद्यार्थी वर्गाची घेतली काळजी!
कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ हायस्कूल समोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दीवसापुर्वि कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे मारुन विद्यार्थी वर्गाची काळजी घेतल्याने सभापती उदय मांजरेकर यांचे पालकवर्गाने आभार मानले आहेत
कुडाळ हायस्कूल आणि पडते वाडी प्रा शाळे जवळ वाहनांची वर्दळ असते आणि विद्यार्थी वर्गाची वर्दळ जोरदार होत असते या मुळे अपघात होण्याची शक्यता असते याची दखल घेत कुडाळ नगरपंचायत बांधकाम सभापती श्री उदय मांजरेकर यांनी आॅनदीस्पाॉट जाऊन अधिकारी यांच्या सोबत पहाणी करुन रंबलर पट्टे मारण्याची सुचना नगरपंचायतीला दिली होती आणि त्याचा पाठपुरावाही केला होता आज बसवलेल्या या रंबलर पटल्यामुळे वाहनांचा वेग आपोआप कमी होणार आहे त्यामुळे अपघात होणार नसुन कुडाळ मधील पालकांनी आणि कुडाळ हायस्कूल शिक्षक तसेच पडते वाडीमधील शिक्षक यांनी श्री मांजरेकर यांचे आभार मानले आहेत