जलजीवनची कामे निधी अभावी बंद ; मक्तेदारांनी घेतली सी. ई. ओ. यांची भेट

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग : आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जलजीवन मक्तेदारांची बैठक संपन्न झाली .या बैठकीत सकारात्मक दृष्ट्या विविध विषयांवर चर्चा झाली संघटनेचे अध्यक्ष दिलीप सावंत यांनी कंत्राटदारांचे प्रश्न मांडताना कामाची देयके मागील दीड वर्षापासून प्रलंबित असलेने कंत्राटदार बँक व खासगी सावकार यांच्याकडून घेतलेल्या कर्जात बुडाला आहे तसेच पुरवठादारांचे व कामगारांचे पेमेंट देवू शकत नाही यामुळे जोपर्यंत मागील कामाला निधी येत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचे सांगितलं .याबरोबरच मुदतवाढी संदर्भात सकारात्मक चर्चा होऊन सरसकट मुदतवाढ द्यायची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्य केले आहे. मुदतवाढी बरोबर घेण्यात येणाऱ्या वाढीव विम्याबाबत दोन दिवसात अभ्यास करून निर्णय घेण्याचे ठरले.तसेच हस्तांतरण , सुरक्षा ठेव परत करणेबाबत तसेच मक्तेदाराचा कोणताही दोष नसताना प्रलंबित असलेले कामे नवीन दराने मंजूर करण्याबाबत चर्चा झाली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व विषयावर सकारात्मक दृष्ट्या निर्णय घेण्याचे मान्य केले या बैठकीत संघटनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष विलास गवस, सचिव उदय पाटील खजिनदार प्रसाद कुलकर्णी ,बिपिन कोरगावकर अण्णा भोगले ,बंड्या सावंत व बहुसंख्य कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते तसेच ग्रामीण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता सुदेश राणे , उप कार्यकारी अभियंता वैभव वाळके व लेखाधिकारी प्रदीप डवरी उपस्थित होते.