बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे दाखल…

ब्युरो न्यूज कोकणशाही

डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे दाखल झालेत. यामध्ये मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची विक्री सुरू होत असून महालक्ष्मी मंदिर परिसरात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी गुजरात, मुंबई कडील येणारे भाविक व ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे कल अधिक असल्याचे निदर्शनास येत असून याच्या विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे. डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मंदिर परिसरात सध्या ८० ते १२० रुपये डझन प्रमाणे फळांची विक्री सुरू असून इतर ठिकाणी फळे १६० ते २०० रुपये डझन प्रमाणे विकली जात असल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. सध्या महालक्ष्मी मंदिर परिसरात १० ते १२ दुकानदार ताडगोळे विक्री करत असून महालक्ष्मी जत्रेत २५ ते ३० दुकानदार ताडगोळे विक्रीसाठी दाखल होतात. ताडगोळे विक्रीतून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.