कुडाळ
कुडाळ वेगुर्ले मार्गावरील गवळदेव या भर रहदारी व वस्तीच्या ठिकाणी दूध स्प्लाय गाडीमध्ये ठेवलेली एका दूध व्यावसायिकाची 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना दुपारी घडली. ही घटना तेथील एका सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाली आहे याच ठिकाणाहून याच दूध व्यावसायिकाची रक्कम चोरीला जाण्याची गेल्या काही महिन्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी सुमारे १५ हजार चोरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रार दाखल करण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू आहे.कुडाळ येथील एक दूध विक्रेता कुडाळ गवळदेव येथे आपला टेम्पो थांबून रस्त्यांचे काम सुरू असल्याने दूध देण्यासाठी रस्त्याच्या पलीकडे गेला होता. दूध देऊन परत येऊन टेम्पो घेऊन दूध घालण्यासाठी पुढे गेला. काही अंतरावर गेल्यावर ड्रायव्हरच्या मागे त्याने ठेवलेली रोख रकम पिशवी त्याला दिसून आली नाही . ही पिशवी शोधूनही न सापडल्याने ही रक्कम चोरीस गेल्याचे त्याच्या लक्षात आले. या पिशवीमध्ये सुमारे 80 हजार रुपये रोख रक्कम होती. यानंतर त्याने पोलिस स्थानकात धाव घेत आपली तक्रार दिली.










