जामसंडे येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या..

देवगड

जामसंडे – शांतीनगर येथील अवधूत मनोहर धुवाळी (वय २५) या युवकाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३१ मार्च रोजी पहाटे ४.१० वा.च्या सुमारास निदर्शनास आली.अवधुत धुवाळी हा जामसंडे- शांतीनगर येथील घरी आईसोबत राहत होता,रात्री तो उशिरा आपल्या घरी आला. त्यानंतर तो आपल्या घरातील खोलीत जावून झोपला. सोमवारी पहाटे ४.१० वा. च्या सुमारास त्याच्या आईला अवधूतच्या खोलीत लाईट सुरू असल्याचं दिसताच आईने खोलीमध्ये खिडकीतून हाक मारत पाहिले त्यावेळेस अवधूत हा खोलीच्या स्लॅबला असलेल्या फॅनच्या अँगलला गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. हे दृश्य पाहून आईने आरडा ओरड करत घराच्या वरच्या मजल्यावर रहाणारा सावत्र मुलगा अमोल मनोहर धुवाळी याला बोलावले. अमोल याने दरवाजा उघडून पाहिले असता अवधूत हा मृत झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची खबर त्यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली . पोलिसांनी सोमवारी सकाळी घटनास्थळी जात पंचनामा केला आणि शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अवधूत याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून तपास पोलिस हवालदार विजय बिर्जे करीत आहेत.